रक्षा टाईम्स नागपुर : अर्जुनी मोरगाव तालुका युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष हितेश हत्तिमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक MIDC कार्यालय, नागपूर येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अर्जुनी मोरगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) येथील MIDC औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू न होणे, स्थानिकांना रोजगार न मिळणे आणि प्लॉट वाटप प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, MIDC क्षेत्रातील अनेक प्लॉट स्थानिकांना न देता बाहेरील व्यक्तींना देण्यात आले असून, काही ठिकाणी संशयास्पद व्यवहार झाले आहेत. त्यामुळे प्लॉट वाटप प्रक्रियेची चौकशी करून भ्रष्टाचारात सामील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जे उद्योगधारक प्लॉट घेत असूनही उद्योग सुरू करत नाहीत, त्यांचे प्लॉट रद्द करून नव्या उद्योगांना देण्यात यावेत, तसेच स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. व लवकरात लवकर याची चौकशी करण्यात यावी अन्यथा युवक काँग्रेस कमिटी व स्थानिक बेरोजगार युवक/युवती याच्यासमाव्ये जण आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेश हत्तिमारे, महासचिव अतुल बन्सोड नगरसेवक अर्जुनी मोर आशिष कापगते विधा.उपाध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप राठोड,माजी तालुका अध्यक्ष चेतन कोरे,तालुका उपाध्यक्ष वैभव दहिवले,उपाध्यक्ष योगेंद्र पालीवाल,महासचिव संकल्प उजवणे,सौरभ हुकरे , अनुप बोरकर,अरुण मेंढे,तेजस कांबळे,पवन बहेकार,दुर्योधन शिवणकर,
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि MIDC क्षेत्रातील गैरव्यवहार उघडकीस यावेत, यासाठी युवक काँग्रेसने शासनाकडे ठाम भूमिका मांडली.





























