गावात भीतीचे वातावरण, शेळी पालकाचे १२ हजार रुपयाचे नुकसान
( विश्वरत्न रामटेके ) अर्जुनी मोरगाव :
तालुक्यातील खांबी येथील हितेश रायभान लोणारे यांच्या घरी बिबट्याने प्रवेश करून दि.१२ फेब्रुवारी २०२६ च्या पहाटे सकाळी ३:३० वाजता दरम्यान गुरांच्या गोठ्यातील शेळीचा फडश्या पाडला आहे.
घराच्या मागील भागाच्या काही अंतरावर अन्य शेतकऱ्याची शेती असून त्या शेतीत मोठया प्रमाणात मका लागवड केली आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसा पुर्वी सकाळच्या पहाटे, पहाटे ला घराच्या मागील रिकाम्या परिसरात बिबट दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती शेळी पशुपालकाचे मोठे भाऊ योगेश रायभान लोणारे यांनी दिली आहे.

तालुक्यात मागील काही महिन्यापासून अनेक गावामध्ये बिबट्याची दहशत आता सुद्धा सुरूच आहे. त्यातच काही ठिकाणी शेळी, बकरी व कोंबड्या यारख्या पशुचा फस्त करण्याचे काम जंगली वन्यप्राणी म्हणजे बिबट किंवा वाघ हे करू लागले आहेत.
याचबरोबर खांबी येथील पशुपालक हितेश रायभान लोणारे यांच्या घरी गुरांचा गोठा असून त्या गोठ्याला पूर्णत: भिंत नसून वरील अर्ध्या भिंतीला विटा व ताराची जाळी लावली नसल्याने. त्यामुळे त्या गोठ्यामध्ये दोन बैल, एक गाय आणि एक शेळी राहत होते पण अचानक दि.१२ फेब्रुवारी पहाटे ३:३० वाजताच्या दरम्यान ५ ते ६ महिन्याच्या गर्भवती शेळी ला बिबट्याने गोठ्याच्या वरील भिंती वरती चढून उडी मारून शेळीचा पोट फोडून फडश्या पाडला आहे. त्यामुळे त्यांचे नऊ ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून, वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे गावातील नागरीकांमध्ये जास्त प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे.





























