भव्य बाईक रॅलीने श्रीमद भागवत सप्ताहाचा आगाज

अर्जुनी मोरगाव येथे सोमवार दि.१७ मार्च पासून होऊ घातलेल्या श्रीमद भागवत कथा साप्ताहाचा आगाज नगरात निघालेल्या भव्य भगवा बाईक रॅलीने झाला.

या रॅलीमुळे नगरात भक्तिमय वातावरण निर्मिती झाली.छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील भागवत कथाकार पं.श्री.लोकेशजी तिवारी यांचे आगमन आज रविवारला (१६) सायंकाळी ४.०० वाजता माँ पेट्रोलियम गणेश नगर येथे झाले.

ढोल ताशाच्या गजरात पं.तिवारी यांचे जोरदार स्वागत आयोजकांनी केले.हि भव्य भगवा बाईक रॅली* *नगरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत मुख्य आयोजक श्री उमेश दुबे यांच्या निवास स्थानी संपन्न झाली.

सोमवारला दुपारी ३.३० वाजता भव्य कलश यात्रेने श्रीमद भागवत कथेचा सुभारंभ होणार आहे.नागरातील कापगते कॉम्पलेक्स स्थित श्री गजानन महाराज मंदिर येथून भव्य कलश यात्रेचा सुभारंभ होऊन मुख्य मार्गाने भ्रमंती करीत कलश यात्रेचा समारोप कार्यक्रम स्थळ कोहळी समाज भवन येथे समापन होईल.

 संगीतमय भागवत कथासारचा आनंद नागरातील भाविक रोज दुपारी ३.३० वाजता पासून घेऊ शकतील.या सात दिवसीय संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री उमेश दुबे आणी अर्जुनी मित्रपरिवाराने केला आहे.

Raksha Times
Author: Raksha Times

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें