नीलकमल स्मृति फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम : अपघातामुळे दिव्यांग झालेली मृणाली कुरसुंगेचा सत्कार

मृणाली दीड वर्षाची असतांना झाला होता अपघात

अर्जुनी मोरगाव:  नीलकमल स्मृती फौंडेशन सडक अर्जुनीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थीनी कु. मृणाली विलास कुरसुंगेचा सत्कार करण्यात आला.
मृणाली, तिची आई, आजी व चुलत भाऊ आदी नातेवाईकाच्या
अंत्यविधीसाठी २ डिसेंबर २०१३ ला चिखलीवरून तिडका येथे दुचाकीने जात होते. चिखली- कोहमारा मार्गावर कोहळीटोला फाट्याच्यासमोर ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता.त्यामध्ये मृणालीची आई,आजी व चुलत भाऊ मृत्यू पावले होते. परंतु, मृणाली सुदैवाने त्या अपघातातून सुखरूप राहिली. परंतु, अपघातात एक पाय गमवावा लागला. त्यामुळे ती एका पायाने दिव्यांग झाली.अपघात झाला तेव्हा ती फक्त दीड वर्षाची होती. आज ती नववीत असून दोन्हीही काखेत बैसाखीच्या सहाय्याने शाळेत ये- जा करते.ती दिव्यांग असूनही शाळेविषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन नीलकमल स्मृती फौंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या तर्फे मुख्याध्यापक एल. एम. पातोडे यांच्या हस्ते संविधान पुस्तक, पुष्पगुछ व रोख देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, ए. बी. बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक तथा नीलकमल स्मृती फौंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम, वसंत
कुरसुंगे, नरेश कडुकार,आशा कोरे,
कामुना मेंढे, फुलन दहिवले, भूमिता म्युनिश्वर, तारा पाऊलझगडे, वस्तीगृहाचे अधीक्षक ईश्वर कांबळे, शिक्षक, कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!