डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

रक्षा टाईम्स अर्जुनी मोर सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
हातावर सुसाईड नोट :- महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाल बदने हा जबाबदार आहे त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यांनीही गेल्या चार महिन्यापासून माझा मानसिक छळ केला अशी तक्रार या महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केली होती. गोपाळ बदने हा गेल्या दोन वर्षापासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याआधी बरड पोलीस ठाण्यामध्ये त्याने सेवा बजावली होती. गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली होती त्यांचा तपास पारदर्शी नाही अशी फलटणमधील लोकांची भावना झाली होती. या संदर्भात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. त्यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचे प्रचंड पडसाद उमटले. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाची तपासाची कमान आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

आज दिनांक 09/11/2025 ला तालुका युवक काँग्रेस कमिटी अर्जुनी मोर. च्या वतीने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्व.संपदा मुंडे यांनी सातारा जिल्ह्यातील व फलटण तालुक्यातील स्थानिक नेत्याच्या व पोलीस प्रशासनातील काही अधिकारी यांच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली होती ही हत्या की आत्महत्या ही एक शंकाच आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून आज कॅन्डल मार्च काढण्यात आला व ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आशिष कापगते ,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हितेश हत्तीमारे महासचिव अतुल बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप राठोड,माजी तालुका अध्यक्ष चेतन कोरे,तालुका उपाध्यक्ष वैभव दहिवले,उपाध्यक्ष योगेंद्र पालीवाल,महासचिव संकल्प उजवणे,सौरभ हुकते,अरुण मेंढे,तेजस कांबळे,पवन बहेकर,दुर्योधन शिवणकर,रितेश तरोने,प्रदूम बहेकर,एकनाथ मुनेश्वर,पवन नाकाडे,प्रवीण बहेकार,ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येतील डॉक्टर्स, सिस्टर्स ,व तालुका युवक काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित मध्ये संपन्न झाला….!
डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली





























