
अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) अर्जुनी-मोर. पंचायत समिती सध्या विविध कारणांनी गाजत आहे. आज 10 नोव्हेंबरला 20 लक्ष रुपये निधीच्या दोन विकास कामाचे भूमिपूजन पंचायत समितीच्या आवारात असताना व भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार बडोले व जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर स्वतः येत असताना पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना व पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही गोष्टीची चाहूल लागू नये त्यामुळे शिष्टाचाराचा भंग तर झाला नाही ना? अशा चर्चा आता सुरू झाल्या असून अनेक पदाधिकाऱ्यांनी सदर प्रतिनिधी जवळ नाराजी व्यक्त करीत सध्या पंचायत समितीवर कंत्राटदारांचेच वर्चस्व राहील का अशा चर्चांना आता उधाण आला आहे.






WhatsApp us