बाळ विक्री प्रकरण : मुख्य आरोपी डॉ. वाजपेयीसह १० जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल; नर्सिंग होमची मान्यता रद्द, सोनोग्राफी सेंटर सील

Child trafficking case: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चांगल्यात गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्यासह दहा आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Child trafficking case: भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चांगल्यात गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्यासह दहा आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात कारवाई करताना डॉक्टरचे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले असून न्यू बालाजी नर्सिंग होमची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

उपचाराच्या नावाखाली दाखल करण्यात आलेल्या महिलांच्या बाळांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत लाखो रुपयात विक्री करण्याचा प्रताप गोंदिया येथील न्यू बालाजी नर्सिंग होम चे डॉ. नितेश वाजपेयी यांच्याकडून सुरू होता. हे प्रकरण पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यात उघडकीस आले. डॉ. बाजपेयी यांच्या विरोधात मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी एक बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक मुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे यांनी हात घेतला.

वेगवेगळ्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास करून बाळ विक्रीचे हे प्रकरण आणखी उलगडत गेले. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी तीन सदस्य एसआयटी या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केली. उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे हेच या समितीचे प्रमुख होते. दरम्यान तपासात डॉक्टरने आणखी दुसरे बाळ विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी डिसेंबर २०२५मध्ये विक्री झालेल्या बाळाचाही छडा लावून त्याला ताब्यात घेतले. अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी डॉ. वाजपेयी याने आत्महत्येचा बनाव करून स्वतःला जखमी करून घेतले होते. परंतु भंडारा पोलिसांपुढे ही चतुराई कामी आली नाही.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!