रेल्वे मंत्रालयाची गोंदियाकरांना नवरात्री निमित्त विशेष भेट

*ब्रम्हपूर ते उधना एक्सप्रेस चे दिनांक २७ सप्टे २०२५ ला शुभारंभ.*

भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओडिशा) आणि उधना (सुरत) यांना जोडणारी नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन २७ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्मपूरहून विशेष सेवा (ट्रेन क्र. 09022) म्हणून होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर या नियमित सेवेचे नाव 19021/19022 ब्रह्मपूर-उधना-ब्रह्मपूर साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस असे आहे. ट्रेन क्र. 19021 दर रविवारी सकाळी ७:४० वाजता उधनाहून (सुरत) सुटेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्र. 19022 दर सोमवारी रात्री ११:४५ वाजता ब्रह्मपूरहून निघेल आणि बुधवारी सकाळी ०८:४५ वाजता उधना येथे पोहोचेल. उधनाहून (सुरत) निघालेली ही ट्रेन दर रविवारी रात्री ०९:४०वाजता गोंदिया जंक्शन येथे पोहोचेल, तर ब्रह्मपूरहून निघालेली रेल्वे दर मंगळवारी रात्री १७:५५ वाजता गोंदिया जंक्शन येथे पोहोचेल. या रेल्वेचे उधना (सुरत), बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धारगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांताबांजी, टिटलागढ, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, परवतीपुरम, बोबिली, विझियानगरम, श्रीकाकुलम, पलासा आणि ब्रह्मपूर येथे थांबा असणार आहे.
या ट्रेनमध्ये २२ आधुनिक एलएचबी (LHB) अमृत भारत कोच असतील, ज्यात ०८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, ०१ पॅन्ट्री कार आणि ०२ एसएलआर कोच यांचा समावेश आहे. ही सेवा ओडिसा, छत्तीसगड, विदर्भ आणि गुजरात या प्रमुख शहरांना जोडताना प्रवाशांना परवडणारा प्रवास उपलब्ध करून देईल.
हि नवीन रेल्वे सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी, रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकजभाऊ भोयर यांचे सुनिल मेंढे यांनी आभार व्यक्त केले.

Raksha Times
Author: Raksha Times

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!